
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला ४६ वा जन्मदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर सचिन आजही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटर आहे. २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिनच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झालेला नाही, सचिनने भारतासाठी दोनशे कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने शंभर शतके झळकावली आहेत. हा विक्रम करणारा सचिन जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

· सचिनचे नामकरण : सचिनचे वडिल रमेश तेंडुलकर प्रसिद्ध संगीतकार एस.डी.बर्मन यांच्या नावावरून सचिन हे नाव ठेवण्यात आले होते.
· पहिली बॅट : सचिन सात वर्षांचा असताना त्याच्या बहीणीने खास काश्मिरहून क्रिकेटबॅट त्याला आणून दिली होती. याच बॅटला पाहून सचिनने भारतासाठी वर्ल्डकप आणावा हे स्वप्न पाहीले होते.
· अष्टपैलू : सचिन एक उत्तम क्षेत्ररक्षक होता, त्यासह गोलंदाज आणि फलंदाजही होता. सचिन लिखाण डाव्या हाताने करतो.
· अर्चना पुरोहित यांच्याशी नाते : ग्वाल्हेर स्टेडिअमच्या व्यवस्थापकांच्या पत्नीला सचिनने बहीण मानले आहे. ज्यावेळी सचिन या शहरात असतो त्यावेळी भेट शक्य नसल्यास अर्चना यांची विचारपूस तो करतो.
· सचिनचे गुडलक : सचिनचे गुडलक काय असेल, सचिन आपल्या खिशात खेळताना मरून रंगाचा रुमाल ठेवत असे.
· गॅरी कस्टन यांनी दिला होता आधार : प्रशिक्षक गॅरी कस्टन यांनी आधार दिल्यामुळेच सचिन हा २०१३ पर्यंत खेळू शकला. अन्यथा २००९ मध्येच त्याने निवृत्तीचा विचार केला होता.
· संघ हरल्यानंतरही सहा वेळा सामनावीर : सचिनच्या नावे असलेला हा विक्रम आजवर कुणीच मोडू शकलेला नाही. सचिन हा सामना हरल्यानंतरही सहावेळा सामनावीर म्हणून गौरविण्यात आला आहे.
· एकदिवसीय सामन्यातील शतक : एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात जास्त शतक लावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
· पुरस्कारांचाही विक्रम : सचिन तेंडुलकर हा राजीव गांधी खेलरत्न, अर्जून, पद्मश्री आणि भारतरत्न म्हणून गौरवलेला एकमेव खेळाडू आहे.
· कसोटी सामन्यातील शतक पूर्ण करण्याचा विक्रम : सचिनने सहा सामन्यात षटकार ठोकावत आपले शतक पूर्ण केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat