यूईएफए स्पर्धेत फरहान अख्तर प्रमुख पाहुणा

24 Apr 2019 17:45:30



मुंबई : युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (यूईएफए) चॅम्पियन्स लीग फायनल्समध्ये अभिनेता फरहान अख्तर विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. यूईएफए चॅम्पियन्स लीग ही अत्यंत मानाची स्पर्धा असून या स्पर्धेसाठी भारतातील अधिकृत अतिथी म्हणून तो हजेरी लावणार आहे. स्पेन येथील मेट्रोपॉलिटॅनो स्टेडियम येथे १ जून २०१९ रोजी हा सामना होणार आहे.

 

फरहान अख्तर हा फूटबॉलप्रेमी असल्याने या स्पर्धेच्या उपांत्य व महाअंतिम फेऱ्यांदरम्यान, सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्क या यूईएफएच्या अधिकृत प्रसारण वाहिन्यांवरही तो आपल्याला दिसणार आहे. 'माय रिझन्स टू वॉच यूईएफए चॅम्पियन्स लीग' या मोहिमेअंतर्गत तो आपल्याशी संवाद साधणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0