सरन्यायाधीशांविरोधात षडयंत्र : सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणेला देणार

24 Apr 2019 16:46:33
 
 

नवी दिल्ली : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या माजी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. गोगोई यांनी हे आरोप फेटळले आहेत. एका वकिलाने केलेल्या दाव्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित वकीलाने फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यामध्ये रंजन गोगोई यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात रचल्याचे त्याने म्हटले होते. याशिवाय त्या महिलेच्या बाजूने निवडणूक लढवावी यासाठी आपल्या दीड कोटी रुपयांची ऑफर आल्याची माहिती त्या वकिलाने दिली होती. या वकिलाचे नाव उत्सव बैन्स असे आहे

बैन्स यांनी आता नवा दावा केल्याने खळबळ माजली आहे. सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असून त्या संदर्भातील सीसीटीव्ही छायाचित्रण आपल्याजवळ आहे, असे त्यांनी सांगितले. हे सीसीटीव्ही फुटेज आपण देशाच्या प्रमुख तपास यंत्रणेला देऊ, असे बैन्स यांनी म्हटले. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमुर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यासंदर्भात शरद बोबडे यांनी स्वत: माहिती दिली आहे. रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची इन हाऊसपद्धतीने चौकशी करण्याचे सुप्रीम कोर्टाने ठरवले आहे.

 
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीमध्ये न्यायमुर्ती एन. वी. रमन आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आहेत. रमन, बोबडे हे वरिष्ठ असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे स्पष्टीकरण बोबडे यांनी दिले आहे तर. तर इंदिरा बॅनर्जी या महिला न्यायाधीश आहेत, त्यामुळे त्यांना या समितीत नेमले गेल्याचे बोबडे यांनी सांगितले. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0