मनमाड शहरात महायुतीची भव्य प्रचार रॅली

    दिनांक  23-Apr-2019
मनमाड : मनमाड शहरात लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारात महायुतीने आघाडी घेतली असून येत्या 29 एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ मनमाड शहरात प्रचार रॅलीने झाला.

 

या प्रचार रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर आरपीआयचे कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन व माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही प्रचार रॅली शिवाजी चौक, ललवाणी बिल्डिंग, 52 नंबर परिसर, महात्मा फुले चौक, भगतसिंग मैदान, आठवडे बाजार, निलमणी मंदिर, सराफ बाजार, सरदार पटेल रोड, रेल्वे स्टेशन, डॉ. आंबेडकर पुतळा, नेहरू रोड, तेली गल्ली, महालक्ष्मी चौक, आझाद रोड या मुख्य बाजारपेठ परिसरातून काढण्यात आली.

 

बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, नरेंद्र मोदी तुम आगे बढो, देश तुम्हारे साथ है, भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचा विजय असो, भारती पवार यांना विजयी करा,” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या प्रचार रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर वसंतराव नाईक या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat