राज्यातील दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

    दिनांक  23-Apr-2019


 


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघामध्ये मतदान आज मतदान होत आहे. या सर्वच मतदारसंघांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून दुपारी १ पर्यंत राज्यात सरासरी ३५.७० टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या मतदारसंघातील दिग्गज नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पुण्यातील मयुरी कॉलोनी येथे सहकुटुंब मतदानाचा आपला हक्क बजावला.


जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची आपल्या कुटुंबासह जामनेर येथे मतदानाचा हक्क बजावला.


कोल्हापूर मधील तपोवन हायस्कूल येथे चंद्रकांत दादा पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी देशाच्या उच्चतम विकासासाठी, पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी सांविधानिक मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले.


भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेत सहकुटुंब मतदान केले. तर भाजप प्रदेश अध्यक्ष व जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनीही कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला.


बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनीही दौंडमधील राहू येथे कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवारांसोबत काटेवाडी मतदान केंद्रात आपला हक्क बजावला.


दिग्गज राजकारण्यांसोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावत मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat