नवी दिल्ली: अभिनेता सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सनीने केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर सनीला गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी आणखीन पाच वर्ष पंतप्रधानपदी राहावेत, असे सनीने भाजप प्रवेशानंतर सांगितले. दरम्यान, शुक्रवार, १९ एप्रिलला सनीने अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर सनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना तोंड फुटले होते. अखेर स्वतः सनीने या चर्चाना पूर्णविराम दिला असून मंगळवारी भाजपात प्रवेश केला.
सनीचे आई-वडील या अगोदरच भाजपात असून वडील धर्मेंद हे बिकानेरचे माजी खासदार असून आई हेमा मालिनी मथुराच्या खासदार आहेत. या देशाच्या विकासासाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर मला जे-जे विकसकामे करता येणे शक्य आहे ते मी नक्कीच करून दाखवणार आहे. मी फक्त बोलणार नाही, तर ते मी माझ्या कामातून दाखवून देईन, असे सनीने प्रवेशानंतर सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat