दाऊदच्या १४ मालमत्तांचा लिलाव होणार

    दिनांक  23-Apr-2019मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या एका फ्लॅटचा १.८ कोटी रुपयांना लिलाव करण्यात आलेला असतानाच आता त्याच्या रत्नागिरीतील खेडच्या १४ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. लिलाव केल्या जाणाऱ्या सर्व मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आईच्या नावे आहेत 'अँटी स्मगलिंग एजन्सी' या संपत्तीचा लिलाव करणार आहे.

 


खेडमध्ये दाऊदच्या या तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे. या बंगल्यात दाऊद राहायला येत असे, शिवाय पेट्रोल पंपासाठीचा एक प्लॉटही आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या १४ मालमत्तांची किंमत ठरविण्यास सांगितले असून या सर्व मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून या मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

 


खेड येथील मुख्य मालमत्ता हसीनाच्या नावावर आहे, तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावे आहे. दाऊदचे बहीण-भाऊ मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात. हे सर्व लोक १९८०च्या दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. मात्र, १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडून आहे. दाऊदच्या कुटुंबातील अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. दाऊदनेही ८० च्या दशकातच भारतातून पलायन केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat