राज्यात आतापर्यंत सरासरी ४६.४८ टक्के मतदान

    दिनांक  23-Apr-2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४६.२८ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. या आकडेवारीनुसार पुण्यातील मतदारांनी सध्यातरी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

 

राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत राज्याच्या १४ मतदार संघात सरासरी ४६.४८ टक्के मतदान झाले आहे. उन्हाचा पारा वाढत असला तरीही मतदार मतदानासाठी बाहेर पडत आहेत. जळगाव ४२.६२, रावेर ४६.०४, जालना ४९.४०, औरंगाबाद ४७.३६, रायगड ४७.९७, पुणे ३६.२९, बारामती ४५.३५ अहमदनगर ४५.६५, माढा ४४.१३, सांगली ४६.६४, सातारा ४४.७७, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७.१८, कोल्हापूर ५४.२४ व हातकणंगलेमध्ये ५२.२७ टक्के मतदान झाले आहे.

 

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, माढा, पुणे व हातकणंगले या १४ मतदार संघामध्ये राज्यात मतदान होत आहे. यासाठी २४९ उमेदवार रिंगणात असून २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat