मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग

    दिनांक  22-Apr-2019मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमवारी सकाळी भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे पाच बंब व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

क्षिण मुंबईत अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णवाहीका, पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाली आहे. या आगीत अद्याप कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याची माहिती समजलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat