श्रीलंकेतील भारतीयांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

21 Apr 2019 16:21:45



 

नवी दिल्ली : ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली असून यात जवळपास १५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून ४०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात परदेशी नागरिकांना लक्ष करण्यात आले असून मृत्यूमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामुळे श्रीलंकेत असलेल्या भारतीयांच्या नागरिकांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भारतीयांसाठी हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत.
 
 

सुषमा स्वराज यांनी यांनी ट्विट करत कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात असून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. भारतीय नागरिकांना मदत किंवा इतर माहितीसाठी संपर्क करता यावा यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. +९४७७७९०३०८२,+९४११२४२२७८८,+९४११२४२२७८९, +९४११२४२२७८९ हे संपर्क क्रमांक देण्यात आले असून याशिवाय +९४७७७९०२०८२, +९४७७२२३४१७६ या क्रमांकावरही भारतीय नागरिक संपर्क करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0