विंग कमांडर अभिनंदन यांची 'वीरचक्र'साठी शिफारस

20 Apr 2019 22:12:17


 


नवी दिल्ली : पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडून शौर्य गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची भारतीय हवाईदल वीरचक्र या शौर्य पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या तीन सर्वोच्च पुरस्कारांमध्ये वीरचक्र पुरस्काराची गणना होते. परमवीर चक्र, महावीर चक्र या पुरस्कारानंतर वीरचक्र हा तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे.

 

भारतीय हवाईदलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर बॉम्बवर्षाव केला होता. या कारवाईत भाग घेणाऱ्या १२ वैमानिकांची वायुसेना पदकासाठी शिफारस करण्यात येणार असून तसा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0