पांड्या, राहुल यांना २० लाख रुपये दंड

20 Apr 2019 15:54:37


 


नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांनी करण जोहरच्या कार्यक्रमात केलेले वक्तव्य अडचणी वाढवणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लोकपाल समितीने हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्यावर करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

विशेष म्हणजे, पांड्या आणि राहुल हे दोघेही प्रत्येकी १-१ लाख रुपये १० शहीद अर्धसैनिक दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे बीसीसीआयच्या लोकपाल समितीने सांगितले आहे. तसेच, दोघांना तेवढीच रक्कम अंध क्रिकेटपटूंसाठी द्यावी लागणार आहे. ही रक्कम त्यांना ४ आठवड्यांमध्ये जमा करावी लागणार आहे. ही रक्कम दोघे नियोजित वेळेत भरू शकले नाहीत, तर ती त्यांच्या मॅच फीमधून कापण्यात येईल असेही बीसीसीआयच्या लोकपाल समितीने स्पष्ट केले आहे.

 

लोकेश आणि हार्दिक यांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करण जोहरशी बोलताना महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधाने केले होते. यांनतर पूर्ण क्रिकेटविश्वातून टीकेजी झोड उडली होती. यावर बीसीसीआयने कारवाई करत दोघांनाही भारताच्या संघातून काही काळासाठी निंलंबित केले होते. त्यानंतर सीईओनी त्यांचे निलंबन मागे घेतले. या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0