'मोदी: जर्नी ऑफ ए कॉमन मॅन' या वेबसीरीजवर बंदी

20 Apr 2019 17:28:11


 


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 'मोदी: जर्नी ऑफ ए कॉमन मॅन' या वेबसीरीजवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर असलेली ही वेबसीरिज 'इरॉस नाऊ'ची निर्मिती आहे. लोकसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत यावर बंदी घातली असून या सीरिजचे प्रक्षेपण तातडीने थांबवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

 

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित असलेल्या 'मोदी: जर्नी ऑफ ए कॉमन मॅन' या वेबसीरीजचे काही भाग 'इरॉस नाऊ'च्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या वेबसीरीजचे प्रेक्षेपण तात्काळ थांबवावे व पुढील आदेश यायच्या आतमध्ये मागील पाच भाग ताबोडतोब काढून टाकण्यात यावेत. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकनंतर त्यांच्या वेबसीरिजवरही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

 

दरम्यान, काही तांत्रिक अडचणीमुळे या वेबसीरिजच्या प्रदर्शनाला उशीर झाल्याचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी सांगितले. या वेबसीरिजमध्ये मोदींच्या वयाच्या १२व्या वर्षापासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आशिष शर्मा, फैजल खान आणि महेश ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील भूमिका साकारल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0