नई जिंदगी भाग म्हणजे ‘मिनी पाकिस्तान’, प्रमोद गायकवाडचा खळबळजनक दावा

    दिनांक  02-Apr-2019सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूरचे माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सोलापूरच्या नई जिंदगी भागाला मिनी पाकिस्तान म्हणाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोलापूर येथील नई जिंदगी भागात दि. ३० मार्चला प्रकाश आंबेडकर यांच्या कॉर्नर सभेवेळी हा वादग्रस्त दावा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

प्रकाश आंबेडकर मंचावर असताना जोशमध्ये असलेले गायकवाड यांनी नई जिंदगी आपला छोटा पाकिस्तान आहे, असे म्हणतातच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. यावर प्रकाश आंबेडकर किंवा उपस्थितांनी कोणीही प्रश्न उपस्थित केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे सोलापुरातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर त्यांनी खालच्या पातळीवरील टीका केली.

 

गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानानंतर समाज माध्यमांवर संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशा पिलावळींना वेळीच आवरले पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य ऐकूनही कोणीही तक्रार केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat