काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी बांधले शिवबंधन

    दिनांक  19-Apr-2019
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश


मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवरून आपण काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची माहिती त्यांनी दिली. यात त्यांनी काँग्रेसपक्षात महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडाना पक्षात प्राधान्य दिले जाते असा आरोप केला आहे.

 

काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रियांका या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रियांका मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुंबईच्या विकासासाठी व महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना हा योग्य पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली होती.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat