मुन्नाभाईच्या सर्किटवर जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

19 Apr 2019 13:31:01

 

 

'मुन्ना भाई एमबीबीएस' मधील आपल्या सगळ्यांना सर्किट म्हणून माहित असलेल्या अर्शद वारसीचा आज जन्मदिवस आहे. जन्मदिनानिमित्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश देशमुखने तर त्याला पंचलाईन स्पेशालिस्टची पदवी दिली आहे. तसेच इलियाना डिक्रुझ, पुलकित सम्राट आणि अशा अनेक कलाकारांनी त्याला जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
अर्शद वारसीने हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी केलेले कष्ट सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. तो आधी बसमध्ये नेल पोलिश आणि लिपस्टिकसारखे कॉस्मेटिक्स विकत असे. जया बच्चन यांनी त्याला 'तेरे मेरे सपने' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याचे आयुष्यच पालटले.
 
 

मग बरेच वर्ष या क्षेत्रात काम केल्यावर हळूहळू त्याला चांगल्या चित्रपटांच्या संधी मिळाल्या, मग आला मुन्ना भाई एमबीबीएस. या चित्रपटामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्याने कधी वळून पाहिले नाही. मुन्ना भाईमधील त्याच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर अवॊर्ड देखील मिळाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0