...यामुळे मारली हार्दिक पटेलच्या मुस्काटात

19 Apr 2019 17:01:40


 


गुजरात : पाटीदार समाजाचा नेता आणि काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक हार्दिक पटेल याला भरसभेत श्रीमुखात लावणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. तरुण गुज्जर असे या व्यक्तीचे नाव असून त्याने हार्दिकवर केलेल्या हल्ल्याचे कारण सांगितले आहे. हार्दिक पटेलच्या पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने आपण त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगितले.

 

सुरेंद्रनगर मतदारसंघातील बढवान येथील जनआक्रोश सभेत आज हा प्रकार घडला होता. तरुण गुज्जरला मारहाण झाल्याने तो सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. हार्दिक मागील तीन वर्षांपासून आपल्या निशाणावर होता असाही त्याने गौप्यस्फोट केला आहे. तरुणने माध्यमांशी बोलताना सांगितले की, "पाटीदार समाजाच्या आंदोलनावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रुग्नालयात उपचार सुरु होते. यावेळी माझ्या कुटुंबियाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले होते. यावेळीच मी ठरवले की या व्यक्तीचा मी बदला घेणार. त्यानंतर अहमदाबाद आंदोलनानंतर माझ्या मुलाला औषध आणण्यासाठी मी गेलो असता सगळं बंद होते. तेव्हापासून तो माझ्या निशाणावर होता. त्याच्या मनाला वाटेल तेव्हा हा गुजरात बंद करतो, रस्ते बंद करतो, तो काय काय गुजरातचा हिटलर आहे का?"

 
संबंधित बातम्या :  भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात!
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0