रतन टाटा आणि डॉ. मोहनजी भागवत यांची भेट!

    दिनांक  19-Apr-2019
नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेतली आहे. नागपूर येथील संघमुख्यालयात या दोघांची भेट झाली. मागील वर्षभरात डॉ. मोहनजी भागवत आणि रतन टाटा यांच्यातील ही दुसरी भेट आहे. सुमारे दोन तास त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या भेटीमागील कारण उघड झाले नसले तरी ही अनौपचारिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी समारोहाचा समारोप कार्यक्रमात या दोघांमध्ये मागील वर्षाच्या ऑगस्टमध्ये भेट झाली होती. यावेळी डॉ. मोहनजी भागवत हे यावेळी मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते तर, विशेष अतिथी म्हणून टाटा उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat