देवरांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

    दिनांक  19-Apr-2019


 


मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करावा असे पत्र एल टी मार्ग पोलीस ठाण्याला दिले आहे. '४ एप्रिल रोजी झवेरी बाजार येथे व्यापारांशी संवाद साधताना मिलिंद देवरा यांनी जैन समाजाला भडकविण्याचा प्रयत्न करणारे विधान केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.' असे निवडणूक आयोगाने पात्रात सांगितले आहे.

 

"शिवसेना अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेने पर्युषण काळात जैन मंदिराच्या समोर मांसाहर शिजवत जैन धर्मांचा अपमान केला होता. ही घटना तुम्ही विसरु नका, मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा." असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी अल्पसंख्याक समुदायाला केले होते.

 

या विधानाविरोधात शिवसेना उमेदवारांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. देवरा यांच्या भाषण तपासल्यानंतर प्रथमदर्शनी मिलिंद देवरा यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सूचना निवडणूक आयोगाने पालिसांना दिल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat