भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात!

19 Apr 2019 13:08:10



 


गुजरात : पाटीदार समाजाचा नेता आणि काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक हार्दिक पटेल याला भरसभेत एकाने श्रीमुखात लगावली. सुरेंद्रनगर मतदारसंघातील बढवान येथील जनआक्रोश सभेत हा प्रकार घडला. हार्दिक सभेला संबोधित करत असताना एका व्यक्तीने मंचावर येऊन थेट हार्दिकच्या कानशिलात लगावली. पहिले काही सेकंद काय घडतंय हे हार्दिक व कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं नाही. अचानक झालेल्या मारहाणीत सर्वच जण भांबारून गेले होते.

 

हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. सुरेंद्रनगर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सोमाभाई पटेल यांच्या प्रचारार्थ बढवान येथे जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हार्दिक हे जनतेला संबोधित करत होते त्यावेळी एका व्यक्तीने अचानक मंचावर येऊन त्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर हार्दिकच्या समर्थकांनी त्या व्यक्तीला पकडून चोप दिला. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करत या व्यक्तीची सुटका केली.

 

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर हार्दिक याने सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपवर आरोप केले. भाजपाला मला ठार मारायचं आहे, त्यासाठीच असे हल्ले घडवून आणले जात असलयाचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी आणि कशामुळे केला याचा पोलीस तपास घेत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0