२१ एप्रिलला GOT चा पुढील भाग रिलीज होणार

19 Apr 2019 12:49:19
 
 

 

सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त झालेल्या गेम ऑफ थ्रोन्स च्या ८ व्या मालिकेतील दुसरा भाग येत्या २१ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एचबीओने आज याची अधिकृत घोषणा करत या एपिसोडची पहिली झलक आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे.

 
 
 
 
 

२१ तारखेला म्हणजेच येत्या रविवारी ९ वाजता हा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. गेम ऑफ थ्रोन्सचा हा शेवटचा सिझन असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वेळच्या गेम ऑफ थ्रोन्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेतील पेहराव भारतातील एक प्रसिद्ध फॅशन डिसायनर कसाब गुप्ता हिने डिझाईन केले आहेत.

 

या मालिकेतील लोकेशन्स, आणि कलाकारांनी एक मोठा चाहत्यांचा वर्ग आपल्याकडे खेचून घेतला. मुख्यतः महाविद्यालयीन मुले-मुले या सिरीजकडे जास्त आकर्षित होताना दिसतात. त्यामुळे फक्त बाहेरच्या देशातच नाही तर भारतात देखील गेम ऑफ थ्रोन्सला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
Powered By Sangraha 9.0