हिरवाईत रमणार तर दापोलीला येणार!

19 Apr 2019 17:26:06


 

 

उन्हाळा आला की आपल्याला वेध लागतात ते म्हणजे थंड हवेच्या, हिरवाई असलेल्या नयनरम्य ठिकाणी जाण्याचे ! यासाठी आपण अनेक वेळा महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, खंडाळा यांसारखी ठिकाणे धुंडाळतो. आता या सगळ्यांमध्ये अजून एक ठिकाण तुम्हाला अप्रतिम निसर्गाचा अनुभव देते, ते म्हणजे आपल्या कोकणात वसलेलं दापोली!

 
दापोली म्हटलं की, आपल्यासमोर हिरवीगार गच्चं गर्द झाडी, अथांग पसरलेला समुद्र आणि शांततेत वसलेली मंदिरं यांचं रमणीय चित्र उभं राहतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत चाललेल्या उन्हाळी तापमानामुळे त्रस्त झालेल्या आपल्या मनाला दापोलीतील गारवा आणि निसर्गसौंदर्य एक आल्हाददायक अनुभव देऊन जातं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या छोट्या आणि निसर्गरम्य दापोलीची शोभा वाढवली आहे ती म्हणजे पितांबरीच्या अॅग्रो टुरिझमने! 

 
 



पितांबरी अॅग्रो टुरिझमचं वर्णन करायचं झालं, तर निसर्गाच्या सान्निध्यात विज्ञान, शेती, आणि अनेक प्रकारची फुलझाडं यांची मेजवानीच जणू ! दापोली परिसरातलं पहिलं आणि एकमेव आयुर्वेदिक आयुर्तेज उद्यान पितांबरी अॅग्रो फार्म्समध्ये उभारलं आहे. ४ एकरच्या परिसरात पसरलेलं पितांबरीचं आयुर्तेज उद्यान आपल्याला निरनिराळ्या दुर्मीळ सुगंधी फुलांची सैर करून आणतं. याच फुलांपासून अगरबत्ती बनविण्याचा कारखानादेखील इथेच आहे.

 

त्याचबरोबर यात आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या, परंतु हळूहळू दुर्मीळ हो चाललेल्या ६०० होऊन अधिक औषधी वनस्पती, वृक्ष आणि वेलींची लागवड काण्यात आली आहे. या विस्तीर्ण परिसरात फेरफटका मारण्यासाठी लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठीही आकर्षण असलेली खिल्लारी बैलजोडी असलेली बैलगाडीदेखील आहे.

 
या फार्मसोबतच दापोलीच्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणं जसं की दुर्गादेवी मंदिर, परशुराम भूमी, सुवर्णदुर्ग, मुरूड वॉटर स्पोर्टस, वेळणेश्वर मंदिर, पन्हाळेकाजी लेणी, कड्यावरचा गणपती हे सारं निवांतपणे बघायचं म्हणजे किमान दोन-तीन दिवस हवेत मग प्रश्न येतो राहण्याचा आणि जेवण्याचा ! तोही पितांबरीनं सोडवलाय. उत्तम आणि अस्सल घरगुती चवीचं, कोकणातल्या मातीतलं जेवण म्हणजे आनंदाची पर्वणीच.
 
 
 

तर मग सुट्टीची परिपूर्ण मजा अनुभवायला आणि एक रिफ्रेशिंग अनुभवासाठी पितांबरी अॅग्रो फार्म्सला नक्कीच भेट द्या!

 
 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0