स्टुडन्ट ऑफ द इयर २ चे नवीन गाणे ट्रेंडिंग

18 Apr 2019 16:08:24
 
 
 
 
मुंबई : आलिया, वरूण आणि सिद्धार्थ मल्होत्रा नंतर तारा, अनन्या आणि टायगर श्रॉफ नव्या जोमाने स्टुडन्ट ऑफ द इयर २ घेऊन येत आहेत. पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटातील 'गिली गिली आख्खा' हे एक कोरे करकरीत गाणे आत्ताच प्रेक्षकांच्या समोर येत आहे.
 
 
 
 
 
 
विशाल आणि शेखर यांनी आर. डी. बर्मन यांच्या गाण्यावरून प्रेरणा घेऊन या गाण्याचा रिमेक केल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले. याच्या मूळ गाण्याची रचना आर. डी. बर्मन यांची, तर किशोर कुमार यांनी हे गेले आहे. हे गाणे युट्युबवर सध्या ट्रेंडिंग असून त्याला आत्ताच ४ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज झाले आहेत. त्यामुळे जुन्या गाण्याला दिलेला नवीन ट्विस्ट काय असेल हे बघायचे असल्यास हे गाणे नक्की पहा. 
 
 
 
 
 
हिरु जोहर आणि करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. येत्या ६ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0