'कलंक' कडून 'केसरी' ची पीछेहाट

18 Apr 2019 11:37:44

 

 महावीर जयंतीच्या शुभमूर्तवार प्रदर्शित झालेल्या 'कलंक' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 'केसरी' या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकत कलंकने पहिल्याच दिवशी साधारण २१ कोटींचे संकलन केले.

 
याआधी केसरी हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रदर्शित झाला होता त्याने २० कोटींची कमाई केली. तर संकलनाच्या दृष्टिकोनातून बघायचे झाले तर केसरी नंतर गली बॉय, टोटल धमाल, उरी - द सर्जिकल स्ट्राईक, लुका छुपी,   मणिकर्णिका आणि सर्वात शेवटी रोमिओ अकबर वोल्टर या चित्रपटांचा अनुक्रम लागतो.
 

आता पुढील काही दिवसात कलंक ची बॉक्स ऑफिसवरची कमाई कळेलच परंतु आत्ताच्या आकड्यांवरून विश्लेषण करायचे झाले तर कलंक हा २०१९ मधील हिट चित्रपट आहे असे दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0