लोकसभा निवडणुकीचा आज दुसरा टप्पा

    दिनांक  18-Apr-2019
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी १२ राज्यांतील ९५ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तर, महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या १० जिल्ह्यात मतदान पार पडत आहे.

 

आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा १३ राज्यांमधील ९७ जागांवर आज मतदान होणार आहे. सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे, आनंदराव अडसूळ यासारख्या दिग्गजांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

 

दुपारी १२ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी २१.०४ टक्के एवढे मतदान

 

> उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात १२ वाजेपर्यंत २०.०९ टक्के मतदान

 

> हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये १२ वाजेपर्यंत २४.०८ टक्के मतदान

 

> लातूर मतदारसंघात सकाळी १२ वाजेपर्यंत २३.१४ टक्के मतदान

 

> परभणी लोकसभा मतदार संघात १२ वाजेपर्यंत २६.१७ टक्के मतदान

 

> नांदेडमध्ये १२ वाजेपर्यंत अंदाजे २४.०४ टक्के मतदान

 

> १२ वाजेपर्यंत बीड मतदारसंघात १९ टक्के मतदान

 

> सोलापूरमध्ये १८ टक्के मतदानाची नोंद

 

> अमरावतीत १२ वाजेपर्यंत २०.५ टक्के मतदान

 

> अकोल्यामध्ये झाले २१.०३ टक्के मतदान

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat