शीव परिसरातून रोकड जप्त

    दिनांक  18-Apr-2019मुंबई : शीव परिसरात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने ११ लाख ८५ हजारांची रोकड पकडली आहे. ही रक्कम निवडणूकीच्या प्रचारादरम्यान वाटण्यासाठी आणली असल्याचा संशय निवडणूक आयोग तपासणी पथकाला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी पथकाने दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह या संशयितांना ताब्यात घेतले आहे. शीव कोळीवाडा परिसरात १७ एप्रिल, बुधवार रात्री विधानसभा मतदार संघातील संजय नारायण वारंग यांचे फिरते तपासणी पथक गस्तीवर होते. यावेळी शीव रुग्णालयाजवळील सिग्नलवर पाहणी करत असताना एका कारची तपासणी केली.

 

यावेळी कारमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह हे तीन जण होते. त्यांच्याकडे ११ लाख ८५ हजारांची रोख रक्कम आढळली. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat