महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती,उपराष्ट्रपती आणि राज्यपालांकडून जनतेला शुभेच्छा

17 Apr 2019 15:43:36

 
 
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी महावीर जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांच्या शांतता आणि अहिंसेच्या शिकवणीने आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या जगात भगवान महावीरांची अहिंसा, सत्य आणि करुणा यांची शिकवण अतिशय महत्वाची ठरते, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी महावीर जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश दिला. त्यांची शिकवण सार्वत्रिक असल्याने संपूर्ण जगासाठी समर्पक असल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
 
 
या पवित्र प्रसंगी भगवान महावीरांची शिकवण आत्मसात करण्यासाठी पुन्हा कटीबद्ध होऊ या आणि अधिक शांततामय विश्वासाठी स्वत:ला वाहून घेऊ या, असे त्यांनी नमूद केले आहे.
 
 
 
राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे जीवनकार्यतसेच त्यांच्याअहिंसा, जीवदया व अनेकांतवादाच्याशिकवणीचे स्मरणदेतो. राज्यातील सर्व लोकांना, मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
 
Powered By Sangraha 9.0