'मेंटल है क्या' लोकांना मेंटल करण्यास सज्ज

17 Apr 2019 12:33:25


 

 

मेंटल है क्या हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कंगना ही तिच्या ठाम आणि बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे कायमच चर्चेत असते तर राजकुमार राव हा अत्यंत शांत आणि कामाशी एकनिष्ठ असल्यामुळे बहुश्रुत आहे. आता या दोन विरुद्ध स्वभावाच्या कलाकारांची व्यक्तीरेखा या चित्रपटात कशी असेल याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल. त्यासाठीच पहा मेंटल है क्या या चित्रपटाचे हे पोस्टर.
 
 
 

 

एकता कपूर निर्मित आणि प्रकाश कव्हेलामुंडी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना राणावत विद्या नावाच्या एका मुलीची भूमिका साकारणार आहे, त्याचबरोबर राजकुमार राव, जिमी शेरगील, अमृता पुरी हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. तर चक्क बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा देखील कॅमिओ या चित्रपटात आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
 
Powered By Sangraha 9.0