मशीदीत महिलाप्रवेश बंदी : घरातच नमाज पठणाचे मौलवींचे आदेश

17 Apr 2019 17:23:05



केरळ : सुन्नी मौलाना आणि इस्लामिक विद्वान यांची प्रभावशाली संघटना 'केरळ जमीयतुल उलमा'ने महिलांच्या मशीदीतील प्रवेशबंदीवर आपले मत व्यक्त केले आहे. महिलांनी घरातच नमाज पठण करावे, असे मत संघटनेने मंगळवारी व्यक्त केले.

 

संघटनेच्या मते न्यायालय हे अशा धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. या संघटनेचे महासचिव अलीक्‍कूटी मुसलियर म्हणाले कि, "आम्ही आमच्या धार्मिक गोष्टींमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप मान्य करणार नाही. आमच्या धर्माच्या निर्देशांचे तंतोतंत पाल करणे गरजेचे आहे.", असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

मुसलीयर यांनी मशीदीत महिला प्रवेशावर बंदी आणण्यावर केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रतिक्रीया देताना हे वक्तव्य केले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. मुसलियर यांच्या मते त्यांच्या संघटनेने सबरीमला मंदीरात महिला प्रवेशावेळीही हीच भूमिका घेतली होती.

 

ते म्हणाले, "मशीदीत केवळ पुरूषच नमाज पठण करू शकतात. महिलांच्या प्रवेशाबाबत असा नियम नाही. याबद्दल नियम चौदाशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. पैगंबर मोहम्मद साहेब यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलो होते." मंगळवारी मुस्लीम महिलांना नमाज पठणासाठी परवानगी देण्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली.

 

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकार, एनसीडब्ल्यू, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, वक्फ बोर्डला नोटीस बजावत चार आठवड्यांपूर्वी उत्तर देण्यास सांगितले आहे. पुण्यातील एका दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम महिलांच्या मशीदीतील प्रवेशाबद्दल याचिका दाखल केली होती. नमाजपठणाचा सर्वांनाच अधिकार आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यावेळी सुनावणी घेताना न्यायाधीश बोबडे म्हणाले, "जसे आपल्या घरात कुणाला प्रवेश द्यायचा आहे त्यावर निर्णय तुम्हीच घेता. त्यात सरकारचा काय संबंध ", असा सवाल त्यांनी विचारला.

 

दरम्यान, सुनावणी मुंबईतील हाजीअली दर्ग्यात महिला प्रवेश प्रकरणाचा उल्लेख करत. ते म्हणाले कि, "हाजी अली दर्गा प्रवेशाबद्दल न्यायालयाने महिलांना परवानगी दिली आहे." मात्र, याचिकाकर्त्यांकडून अजूनही काही ठिकाणी प्रवेशबंदी सुरूच असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी कॅनडा येथीलएका मशीदीचाही हवाला दिला.''

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0