काँग्रेस नेत्याने काढली राष्ट्रपतींचीच जात

17 Apr 2019 15:16:55


 


नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांच्या एका वादग्रस्त विधानाने चांगलेच राजकारण तापले आहे. त्यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर जातीवादक टिपणी करून पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. "गुजरातच्या निवडणुका जवळ आल्या होत्या त्यावेळी भाजपला गुजरातमध्ये यश येणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे जातीय समीकरणे जुळवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यात आले." असे वादग्रस्त विधान अशोक गेहलोत यांनी केले.

 

अशोक गेहलोत यांनी निवडणुकीच्या राजकारणात थेट राष्ट्रपतींनाच ओढल्यामळे या लोकसभा निवडणुकीत हा वाद चांगलाच स्फोटक बनला आहे. अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी हे वक्तव्य करून गंभीर वादाला तोंड फोडले आहे. राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. आता लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी गेहलोत यांनी तयारी सुरु केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0