कॉंग्रेसमध्ये गुंडाराज : प्रियांका चतुर्वेदींचा पक्षाला घरचा अहेर

17 Apr 2019 17:54:39





लखनऊ
: उत्तर प्रदेशात कारवाईनंतर काही नेत्यांना पक्षात पुन्हा स्थान दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी टि्वटरद्वारे पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींसह गैरवर्तन झाल्यामुळे उत्तर प्रदेशात या काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली होती. कॉंग्रेसने पुन्हा आता त्यांना पक्षात स्थान दिल्यामुळे प्रियांका नाराज आहेत.

प्रियंका चतुर्वेदी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्यांच्याऐवजी आता पक्षात गुंडांना प्राधान्य दिले जात आहे. ज्या पक्षासाठी मला ऐकून घ्यावे लागले. संघर्ष सहन करावा लागला आता ज्यांनी मला धमकावले त्यांच्यावर कारवाई होणार नाही का. हे दुर्देव आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी एका पत्रकाचा आधार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढवला. त्यानुसार, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्तक्षेपानंतर नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सिंधिया काँग्रेसचे सरचिटणीस व उत्तर प्रदेशची जबाबदारी पार पाडत आहेत. एका पत्रकार परिषदेदरम्यान प्रियंका यांच्यासोबत गैरप्रकार घडला होता. त्यामुळे त्या नाराज आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



Powered By Sangraha 9.0