ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गो.मा. पवार यांचे निधन

    दिनांक  16-Apr-2019

 

 

 

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गो.मा. पवार यांचे आज पहाटे सोलापूर येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी आपले उभे आयुष्य मराठी साहित्याच्या सेवेसाठी वाहून दिले. साहित्य सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवनकार्य आणि आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला. याच अभ्यासावरून त्यांनी महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य हे पुस्तक लिहिले.
 

मराठी भाषेमध्ये समीक्षण करणाऱ्या साहित्यिकांपैकी विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे ते एकमेव साहित्यिक होते. साहित्य क्षेत्रात अमूल्य कामगिरी करत असतानाच मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळावर त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. निवडक मराठी समीक्षाविनोद : तत्त्व आणि स्वरूप, मराठी विनोद : विविध आविष्काररूपे अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

 

मराठी साहित्यातील त्यांच्या या अभूतपूर्व कार्यामुळे त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचबरोबर डाॅ. व.दि. कुलकर्णी स्मृति पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat