शत्रुला नेस्तनाबूत करणाऱ्या ‘निर्भय’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

15 Apr 2019 19:34:48



नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या आणि स्वदेशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या निर्भयया सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ही चाचणी घेतली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे.

 

स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्रामुळे भारत संरक्षण क्षेत्रात आणखी मजबूत झाला आहे. शत्रूवर हल्ला करताना अचूक लक्ष्यभेद करणे हे 'निर्भय'चे प्रमुख उद्दीष्ट्य आहे. याची सफल चाचणी ही डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या वैज्ञानिकांचे मोठे यश मानले जात आहे. सोमवारी ओदीशातील चंदीरपूर येथील समुद्री तटावरील एका केंद्रात ही यशस्वी चाचणी घेण्यात आली.

 

या क्षेपणास्त्राची संकल्पना आणि अभिकल्पना ही संपूर्णपणे वैज्ञानिकांचीच आहे. या सफल चाचणीमुळे भारतीय सैन्याची क्षमता आणखी विस्तारणार आहे. हे क्षेपणास्त्र दोनशे ते तिनशे किलोपर्यंतची युद्ध सामग्री सहज घेऊन जाऊ शकते. या क्षेपणास्त्राची पहीली चाचणी १२ मार्च २०१३ रोजी करण्यात आली होती. मात्र, ही चाचणी यशस्वी न झाल्याने दुसरे परिक्षण १७ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आले.

 

१६ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या चाचणीत हे मिसाईल लक्ष्यापासून भरकटत होते. नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आलेल्या चाचणीत हे क्षेपणास्त्र यशस्वी झाले. या सर्व चाचण्या ओदीशा येथील चांदीपूर केंद्रातच करण्यात आल्या होत्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0