केसरीचा १५० कोटींचा टप्पा पार

15 Apr 2019 11:20:34


 

मुंबई: अनुराग सिंग दिग्दर्शित केसरी या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूड मधला प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या करण जोहर याने ही आनंदाची बातमी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. या चित्रपटाने जगभरात देखील प्रचंड कमाई करत १९६ कोटींची मजल मारली आहे. केसरी या चित्रपटात अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत असून ही कथा भारतातील एका गाजलेल्या लढाईवर आधारित आहे.

 
 

धर्मा प्रोडक्शन हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यासमोर अनेक चित्रपट येतात. त्यामध्ये स्टुडन्ट ऑफ द इयर, बाहुबली, कलंक, बकेट लिस्ट अशा वेगवेगळ्या पठडीतल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. आणि आता यामध्ये अजून दोन चित्रपटांची भर पडत आहे ती म्हणजे केसरी आणि कलंक या चित्रपटांची.

 
बाहुबली चित्रपटाने ज्या पद्धतीने बॉक्स ऑफिस तोडून कमाई केली त्याप्रमाणेच आगामी चित्रपट त्याला अपवाद नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या केसरीने तर आता चांगली कमाई केलीच आहे त्यामुळे आता आगामी प्रदर्शित होणाऱ्या कलंक या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0