'जेट' वाचवण्यासाठी मोदींना साकडे

15 Apr 2019 16:26:57




मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज विमान कंपनीला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टेट बॅंकेने पुढाकार घ्यावा, अशी विनंती 'नॅशनल एव्हीएटर गिल्ड' या वैमानिक संघटनेने केली आहे. सरकार आणि बॅंकांकडून जेट एअरवेजला पंधराशे कोटींचा निधी मिळण्यासाठी संघटनेने ही मागणी केली आहे. जेट एअरवेजवर आलेल्या या संकटामुळे कंपनीतील २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांचा राजीनामा 

जेट एअरवेजमधील कर्मचाऱ्यांचे जानेवारीपासून वेतन थकीत आहे. कंपनीतील वैमानिकांनी सोमवारपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना कंपनी व्यवस्थापनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन रविवारी रात्री उशीरा मागे घेण्यात आले. "जेट एअरवेजला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी स्टेट बॅंकेने पंधराशे कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विमानसेवा सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कंपनीतील २० हजार नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, अशी विनंती करण्यात आल्याची माहीती एनएजी संघटनेचे उपाध्यक्ष आदीम वालीयानी यांनी दिली.

संबंधित बातम्या : जेट एअरवेजमधून प्रवास उपाशीपोटी ! 

सध्या आर्थिक स्थिती कोलमडलेल्या जेट एअरवेजची केवळ सहा ते सात विमाने सेवेत आहेत. इतर विमाने जमिनीवर आहेत. आर्थिक नियोजन कोलमडल्याने इतर विमाने जमिनीवरच आहेत. विमान दुरुस्ती करणारे कर्मचारी, तपासणीस यांनी वैमानिकांनी अनियमित वेतनामुळे 'उड्डाण बंद' आंदोलनाला पाठींबा दिला होता. वैमानिकांनी १ एप्रिलपासूनच संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने पंधरा दिवसांचा अवधी मागितल्याने हा संप मागे घेण्यात आला होता. सोमवारी पुन्हा हे आंदोलन सुरू केले जाणार होते. सोमवारी जेट एअरवेजतर्फे अंतिम निर्णयासंदर्भात बैठक घेतली जाणार आहे. त्या आधारावर कर्मचारी संघटना पुढील भूमिका ठरवणार आहेत. कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१८ रोजी शेवटचे वेतन मिळाले होते. कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

 
अग्रलेख : जेटचे विमान उडायलाच हवे!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0