दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत ३८ उमेदवार गुन्हेगार

    दिनांक  15-Apr-2019महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सचे विश्लेषण

 

मुंबई : महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले आहे. यात तब्बल २१ टक्के म्हणजे ३८ उमेदवाराविरोधात गुन्हे दाखल आहेत. यात वंचित आघाडीच्या चार, बहुजन समाज पक्षाच्या तीन, शिवसेनेच्या चार, काँग्रेसच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

 

बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या १० मतदारसंघातून तब्बल १७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून यापैकी १७८ उमेदवारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यापैकी ३८ उमेदवाराविरोधात गुन्हे दाखल असून यापैकी २३ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील दहा पैकी सहा मतदारसंघ अति संवेदनशील मतदारसंघ आहेत.

 

दुसऱ्या टप्प्यातील विश्लेषित केलेल्या १७८ उमेदवारांपैकी ४५ उमेदवार हे कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता २ कोटी ८३ लाखापेक्षा जास्त आहे. पक्षनिहाय वर्गवारी केली असता यात वंचित बहुजन आघाडीचे सात, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादीचे चार आणि बसपाचे तीन उमेदवार कोट्याधीश आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat