देशभरात राम नवमीचा मोठा उत्साह; राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

13 Apr 2019 12:52:23




नवी दिल्ली : आज देशभरात राम नवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरातील राम मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. रामाची जन्मभूमी असलेली अयोध्यानगरीही रामजन्माच्या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम नवमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छात म्हटले आहे की, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवनातून आपल्याला त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुन मार्गक्रमण करण्यासाठी आणि विचार आणि कृतीत महानता आणण्यासाठी प्रेरणा मिळते. समृद्ध राष्ट्र आणि सौहार्दपूर्ण जगासाठी ही मूल्यं बिंबवूया.

 

मुंबईसह राज्यातही राम नवमीचा मोठा उत्साह आहे. शिर्डीच्या साईमंदिरात तीन दिवस राम नवमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. आजच्या पहिल्याच दिवशी राम नामाच्या जयघोषात साई नागरी दुमदुमली आहे. मुंबईतील वडाळ्याच्या राममंदिरातही सकाळपासूनच भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0