शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

13 Apr 2019 11:54:33



श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गाहिंद परिसरात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर केलेल्या कारवाईत जैश कमांडर शाहजहां व रईस खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

 

गाहिंद परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला घेरले. यानंतर झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले तर अद्याप उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात अली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0