२ हजार ६२६ कोटींचा मुद्देमाल जप्त ; निवडणूक आयोग

12 Apr 2019 11:30:19



नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.

 

आयोगाने जप्त केलेल्या २ हजार ६२६ कोटी रुपयांमध्ये ६०७ कोटी कॅश स्वरुपात तर १९८ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच १ हजार ९१ कोटी रुपये ड्रग आणि नार्कोटिक्सच्या रुपात जप्त करण्यात आले आहेत. तर ४८६ कोटी रुपयांचे धातू जप्त करण्यात आले असून इतर ४८ कोटी रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले आहेत, असेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0