देशवासियांनो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा - डॉ. मोहनजी भागवत

    दिनांक  11-Apr-2019


 


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपला नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी देशवासियांना मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाहीमध्ये मतदान करणे हे नागरिकांचे कर्तव्य असते, यामुळे सर्वांनी घराबाहेर पडून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा, असे ते म्हणाले.

 

नागपुरमधील महाल येथील स्वर्गीय भाऊजी दफ्तरी विद्यालयात त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सुरक्षा, विकास आणि राष्ट्राची एकात्मता या मुद्द्यांना समोर ठेऊन योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

 

यावेळी भैय्याजी जोशी यांनीही नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत नोटा हा पर्याय दाबून मत वाया घालवण्यापेक्षा जो उमेदवार योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असे सांगितले. तर दुसरीकडे राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat