राहुल गांधींच्या चिंता वाढवणार स्मृती इराणींच्या या योजना

11 Apr 2019 18:06:56




नवी दिल्ली : स्मृती इराणी यांच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने महिला कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना सुरू केल्या आहेत. यात हस्तशिल्प, हस्त कला या मोहीमांमुळे महीला सशक्तीकरणावर भर दिला जात आहे. अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्मृती इराणी यांना यामुळे महिलांचा पाठींबा मिळू शकतो. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्मृतींनी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी पूजा-अर्चना व होम-हवनदेखील केले. नंतर रोड शो करून स्मृतींनी आपला अर्ज दाखल केला. स्मृतींच्या रोड शोला अमेठीतील नागरिकांनीही भरभरुन प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयाने राबवलेल्या मोहीमांचा प्रचार स्मृती इराणी करणार आहेत.  

हातमाग क्षेत्र

तिसऱ्या हातमाग गणनेनुसार (२००९-१०) नुसार देशभरात एकूण ४३.३१ लाख हातमाग कामगार आहेत. यातील ७७ टक्के या सहाय्यक महिला आहेत. या कामातून त्या आपल्या घरखर्चासाठी हातभार लावतात. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या योजना अशा कामगारांपर्यंत पोहोचून त्यांच्या कल्याणासाठी काम करत आहेत.

 

· राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम

· हातमाग कामगार व्यापक कल्याण योजना

· धागा आपूर्ति योजना

· हातमाग कामगार व्यापक क्लस्टर योजना

· राष्ट्रीय विकासकामांअंतर्गत महिलांसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.

· या कार्यक्रमाअंतर्गत गेल्या चार वर्षात ४१२ समुहांना मंजूरी देण्यात आली आहे.

· एकूण १ लाख ७१ हजार ८२२ महिला या योजनांच्या लाभार्थी आहेत.

· ७ ऑगस्ट २०१८ रोजी जयपूरमध्ये राष्ट्रीय हातकामगार दिन साजरा केला जाणार आहे.

· या योजनांतर्गत एनआईओएस अंतर्गत 'इग्नू'च्या अभ्यासक्रमात ७५ टक्के अनुदान दिले जात आहे.

 

हस्तशिल्प क्षेत्र

 

या क्षेत्रात एकूण ७० लाख शिल्पकार आहेत. 'पहचान पहल' या अंतर्गत ओळख पत्राद्वारे आत्तापर्यंत त्यापैकी २५ लाख जणांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ५६.०७ टक्के महिला आहेत.

 
 

रेशम क्षेत्र


भारतातील रेशम उद्योग विकास अंतर्गत महिलांना विविध उपक्रमाअंतर्गत जोडण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत या क्षेत्राच्या उभारीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सिल्क समग्र या मोहिमेअंतर्गत महिला सशक्तीकरण अंतर्गत रेशम उत्पादनात ५५ टक्के महिलांना यातून रोजगार मिळत आहे. सिल्क समग्र अंतर्गत भारत सरकारने ३८ हजार ५०० दशलक्ष टन रेशम उत्पादन करण्यात आले आहे. याशिवाय एकीकृत कौशल विकास योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

राहुल गांधींविरोधात लोकसभेसाठी उभे राहीलेल्या स्मृती इराणी या योजना समोर ठेऊन प्रचार करू शकतात. महिला शक्तीचा मोठा पाठींबा स्मृती इराणी यांना यावेळी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0