मनमाड मध्ये आघाडीत बिघाड

11 Apr 2019 18:24:31
 

मनमाड शहर काँग्रेसचा धनराज महाले यांच्या प्रचारावर बहिष्कार


मनमाड : नुकतीच मनमाड शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या निवासस्थानी माजी आमदार आनिल आहेर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार पंकज भुजबळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी असतांना देखील आमदार पंकज भुजबळ काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत, अशी टीका यावेळी या बैठकीत करण्यात आली.

 

. भुजबळ यांच्या कार्यपद्धतीवर यावेळी उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचे कार्य आ. भुजबळ करत असल्याने यावेळी आमदारांच्या कृतीचा निषेध करण्यात आला. या सर्वांचा एक भाग म्हणून मनमाड शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनरज महाले यांचा प्रचार न करण्याचे व प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय बैठकीत एक मताने घेण्यात आला आहे.

 

तसेच, नगर पालिका निवडणुकीत आ. पंकज भुजबळ यांनी लक्ष घातले असते तर काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा नगराध्यक्ष झाला असता पण भुजबळ यांनी विरोधकांना साह्यभुत होईल अशी भुमिका घेतली असल्याचे मत देखील यावेळी बैठकीत उपस्थित सदस्यांनी मांडले. या बैठकीत नांदगाव तालुका अध्यक्ष समाधान पाटिल यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. या निर्णया मुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सर्व काही अलबेल आहे असे दिसत नसुन आघाडीत बिघाडी झाली आसून यावा फायदा भाजप उमेदवार डॉ.भारती पवार यांना होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0