'या' दिवशी प्रदर्शित होणार 'पीएम मोदी' चित्रपट

10 Apr 2019 12:47:42



मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट मिळाले आहे. हा चित्रपट १३० मिनिटे म्हणजेच दोन तास दहा मिनिटे लांबीचा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या चरित्रपटाला लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाचाच मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट गुरुवारी ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते. तसेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते. चित्रपट पाहणे हे न्यायालयाचे नाही, तर सेन्सॉर बोर्डाचे काम आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वीच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केल्याविषयी याचिकाकर्त्यांना प्रतिप्रश्न केला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0