दूरदर्शनच्या ट्यूनवरचा ब्रेक डान्स व्हिडिओ व्हायरल!

07 Mar 2019 16:07:48

 

 
 
 
मुंबई : आजच्या सोशल मीडियाच्या जगात कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आणि एखादी व्यक्ती रातोरात स्टार होईल, याचा काही नेम नाही. सध्या दूरदर्शनच्या ट्यूनवर ब्रेक डान्स करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दूरदर्शनवर बातम्यांच्या आधी लागणारी धून अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. विरारमध्ये राहणाऱ्या वैशाख नायर असे या तरुणाचे नाव असून त्याचा या टिकटॉक व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. दूरदर्शनने आपल्या स्वप्नातही याचा विचार केला नसेल. अशी कॅप्शन वैशाखने हा व्हिडिओ शेअर करताना वापरली आहे.
 
 
 
 

सोशल मीडियावर अवघ्या काही तासांमध्येच १ लाख ७८ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. ५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या. दूरदर्शनच्या सुप्रसिद्ध संगीताच्या धूनवर अशाप्रकारे ब्रेक डान्सही करता येऊ शकतो. अशी दूरदर्शनने कधी कल्पनाही केली नसेल. अशी प्रतिक्रिया अनेकांनी या व्हिडिओबाबत दिली आहे. दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने वैशाखच्या ब्रेक डान्सची दखल घेत, हा टिकटॉक व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओमुळे वैशाख नायर हा तरुण स्टार झाला असून सोशल मीडियावरून अनेकजण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0