सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव

    दिनांक  06-Mar-2019


 


सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर' असे या विद्यापीठाचे नवीन नाव असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नामांतराचा मुद्दा अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोडवण्यात आला. याबाबतचा अध्यादेश काढण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

 

धनगर समाजाने या विद्यापीठाला अहिल्याबाईंच्या नावासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने केली होती. या आंदोलकांच्या लढ्याला अखेर यश आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय उपसमितीने जनभावना जाणून घेतल्यानंतर नामविस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ प्रकरण एक मधील अनुसूची भाग एक मधील अनुक्रमांक १० मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देखील देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat