
प्रयागराज : मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर सुरु झालेला प्रयागराज येथील कुंभमेळा आज महाशिवरात्रीच्या पर्वावर संपणार आहे. येथील कुंभमेळ्यातील शेवटचे पवित्र स्नान आज होणार आहे. उपासक आणि शिवभक्त या पर्व स्नानानंतर आपापल्या गावी परतणार आहेत. प्रयागराज येथील हा कुंभमेळा ऐतिहासिक असाच झाला असा म्हणण्यास हरकत नाही. कारण या कुंभमेळ्या दरम्यान विविध विक्रमांची नोंदणी करण्यात आली आहे.
२०१९ या प्रयागराज कुंभमेळ्याची नोदंणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. एका स्थानी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठे स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम या ठिकाणी झाले आहेत. याचमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कुंभमेळ्याची नोंदणी झाल्याची माहिती संस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, १५ जानेवारी रोजी प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु झाला होता. कुंभमेळ्याची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २२ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात डुबकी घेतली आहे. तर आज जवळपास दोन कोटी भाविक पवित्र त्रिवेणी संगमात डुबकी घेण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat