अमेठीत बनणार जगातील सर्वात खतरनाक रायफल

    04-Mar-2019
Total Views |



एके-२०३ रायफलींच्या निर्मीती प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन


नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या अमेठीमध्ये एके-२०३ असॉल्ट रायफल्सचा निर्मिती प्रकल्प उभा राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या निर्मिती प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन केले. अमेठी हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. अमेठीत बंद पडलेल्या कोरवा दारुगोळा निर्मिती प्रकल्पात मेक इन इंडिया अंतर्गत ७ लाख ५० हजार असॉल्ट रायफल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार आहे.

 

रशियाच्या सहकार्याने या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात आधुनिक एके-२०३ रायफलींची निर्मीती केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. एके-४७ रायफलची ही सुधारित आवृत्ती असून याद्वारे अचूक निशाणा साधला जातो. अ‍ॅटोमॅटीक आणि सेमी अ‍ॅटोमॅटीक दोन्ही यंत्रणा या रायफलमध्ये आहे. दरम्यान, यामध्ये ऑर्डनान्स फॅक्टरी मंडळाकडे याचे ५०.५ टक्के तर रशियाकडे ४९.५ टक्के समभाग असणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat