सेवायज्ञाच्या स्त्रीशक्तीचा सन्मान...

    दिनांक  04-Mar-2019


 

वैद्यकीय आणि सामाजिक कार्याबद्दल एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई येथून डी.लिट पदवी डॉ. ज्योत्स्ना कुकडे (कुकडे काकू) यांना मिळाली. त्या पदवीमागील त्यांची तपश्चर्या आणि केलेला त्याग शब्दातीत आहे.

 

जगणे माझे माणूस व्हावे।

शाश्वत मूल्यांची प्रेरणा व्हावे॥

काट्यांनी घेरूनही

आनंदाची फुले उमलवणारे,

जगणे माझे माणूस व्हावे...

 

समाजामध्ये आनंद पेरणारे ‘माणूसपण’ लाभणे हा केवळ दैवीयोगच असतो. हा योग डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांना लाभला. लातूर येथे १९६६ सालापासून समाजासाठी तन-मन-धन अर्पून वैद्यकीय सेवा करणाऱ्या सेवाव्रती म्हणून डॉ. ज्सोत्स्ना कुकडे यांचे सामाजिक योगदान मोठे आहे. माणसाच्या आयुष्यात नेहमीच ‘ऑल इज वेल’ कधीच नसतेच. पण, असे ‘ऑल इज वेल’ नसले तरी, आपण घेतलेले निर्णय आणि हाती घेतलेले काम यांच्या पूर्तीचा परिणाम हा ‘ऑल इज वेल’ असायलाच हवा आणि याची प्रचिती देणारे डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचे आयुष्य आहे.

 

पुण्याच्या दत्तात्रेय गोखले आणि दमयंती गोखले यांच्या कन्या ज्योत्स्ना. ज्योत्स्ना यांचे माहेर आणि सासर कर्तृत्वान आणि सरस्वतीचे पूजन करणारे. ज्योत्स्नांची आई दमयंती गोखले त्याकाळी द्विपदवीधर होत्या. ज्योत्स्ना यांचे आजोळ पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’ची स्थापना केलेल्या पेंडसे कुटुंबातील. एस. एम. जोशी हे ज्योत्स्ना यांच्या मावशी तारा यांचे यजमान. हे सगळे सांगण्याचे कारण की, संस्कार आणि कर्तृत्व यांचे अमूल्य देणे ज्योत्स्ना यांना वारसा हक्कांनेच मिळाले होते. डॉ. ज्योत्स्ना यांचे पती डॉ. अशोकराव कुकडे हेसुद्धा ध्येयशील व्यक्तिमत्त्व. विवाहानंतर एका वर्षातच अशोकराव आणि ज्योत्स्ना यांनी आपले बिऱ्हाड लातूरला हलवले. डॉ. रामभाऊ अलूरकर, डॉ. गोपिकीशन बराडीया हे दोघे समविचारी त्यांच्यासोबत होतेच. नवा संसार नवे गाव आणि तेथील सगळे अज्ञात. अशा परिस्थितीमध्ये संसारासोबत ग्राम आरोग्य सेवेला प्राधान्य द्यायचे, हे मोठे आवाहन. पण, हे आवाहन डॉ. ज्योत्स्ना यांनी पेलले.

 

स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे त्यांचा अनेक महिलांशी संपर्क असायचा. महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांसोबत काही सर्वत्र दिसणारे, सर्वांना वेढून टाकणारे काही इतरही प्रश्न आहेत, ज्यांचा मागोवाघ्यायलाच हवा असे त्यांना वाटे. डॉ. ज्योत्स्ना विचार करीत की, रुग्ण आपल्याकडे आला, तर केवळ गोळ्या-औषधे देऊन त्याला पाठवणे ही नीतिमत्ता नाही. या शारीरिक दुखण्यापलीकडील वेगळे दुखणेही असू शकते. त्याचा विचार डॉक्टर म्हणून नाही, तर माणूस म्हणून करायलाच हवा. अल्पावधीतच डॉ. ज्योत्स्ना कुकडे या लातूरवासीयांच्या ‘कुकडे काकू’ झाल्या. कुकडे काकूंनी १९८३ साली ‘जागृती मंडळा’ची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे आणि जनजागृतीचे अनेक उपक्रम सुरू झाले. गर्भलिंग चाचणी ही १९७०-८०च्या दशकात तशी बेकायदेशीर नव्हती.

 

कुकडे काकूंकडेही गर्भलिंग चाचणी करण्यासाठी काही जोडपी येत. त्यांना म्हणत, “तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन आहे. त्यावर मुलगा आहे की मुलगी एवढं तपासा. पुढचे सगळे सोपस्कार तुमच्या रुग्णालयामध्येच करू.” मानवतावादी विचारांच्या कुकडे काकूंना हे ऐकून खूप वाईट वाटे. त्यांच्याकडे या चाचणीची मागणी करणाऱ्या सर्वच जोडप्यांचे त्यांनी त्याकाळी यशस्वी समुपदेशन केले. अर्थात, त्यावेळी ही गर्भलिंग चाचणी बेकायदेशी नव्हती. पण, कुकडे काकूंच्या नीतिनियमात ती बसत नव्हती आणि म्हणून त्यांनी समाज प्रवाहाविरुद्ध विचार केला.

 

तो काळ होता १९७५चा. त्यावेळी काकूंचे पती म्हणजेच अशोकराव हे आणीबाणीमुळे तुरुंगात गेले. ध्येयशीलपणामुळे जिद्दीने त्यांनी विवेकानंद रुग्णालय सुरू केले. घरात सात वर्षांची लहान मुलगी. पती तुरुंगात. कसे होणार? पण, त्या थांबल्या नाहीत. त्यांनी शांतपणे परिस्थितीचा विचार केला आणि निर्णय घेतला. सात वर्षांच्या लाडक्या मुलीला शिक्षणासाठी पुण्याला ठेवले. कारण, पतीने आणि स्वत: ठरवलेल्या ध्येयाची पूर्तता त्यांना करायची होती. मग, आरोग्यसेवेत खंड पडून कसे चालेल? तब्बल २२ महिन्यांनी अशोकराव घरी आलेकुकडे काकूंवर अनेक आघात होत गेले. १९८३ साली त्यांना स्तनांचा कर्करोग झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा त्यांचे सेवा कार्य सुरू झाले. जेव्हा लातूरला भूकंप झाला, त्यावेळी उद्धवस्त लातूरच्या आरोग्याच्या पुनर्वसनासाठी अशोकराव कुकडे आणि कुकडेकाकूंनी सेवेची परिसीमा गाठली.

 

सेवाकार्य सुरूच होते. मात्र, २००९ साली काकूंना जिभेचा कर्करोग झाला. ते दिवस खूप वेदनादायी होते. पण, त्या शारीरिक वेदनांचा किंचितही कवडसा आपल्या सेवाकार्यावर पडू दिला नाही. खरे म्हटले, तर इतके आघात सहन करूनही व्यक्ती समाजाच्या सेवेसाठी तत्पर आहे, तेही वय वर्षे ७८ असताना; हा मोठा सुखद अपवादच आहे. ‘देवा, मलाच का असे दु:ख?’ असे या माऊलींच्या मनात कधीही आले नाही आणि येत नाही. यावर कुकडे काकू म्हणतात,“जगणे असेच असते, ऊन पावसाचे. ते समर्थपणे जगता आले पाहिजे.” अर्थात, जीवनाच्या सर्वच उन्हाळ्यात- पावसाळ्यात अशोकराव कुकडे समर्थपणे कुकडे काकूंच्या सोबत आहेत.

 

कुकडे काकूंना १९९६ साली शासनाचासावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाला आणि २०१९ ला एसएनडीटी विद्यापीठ, मुंबईकडून त्यांना वैद्यकीय आणि सामाजिक कामासाठी सन्माननीय ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’(डी.लिट) पदवी प्रदान करण्यात आली. तो सन्मान डॉ. ज्योत्स्ना कुकडे नावाच्या स्त्रीशक्तीचा होता. जिने कोणत्याही समस्येसमोर हार पत्करली नव्हती. हा सन्मान होता त्यांच्यातील समाजशील आंतरिक शक्तीचा, ज्यांनी आरोग्यसेवेचा निर्धार आजही कायम प्रज्वलित ठेवलेला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
वैद्यकीय क्षेत्र मुंबई विद्यापीठ ज्योत्सान कुकडे माणसं दत्तात्रेय गोखले दमयंती गोखले Medical Sector University of Mumbai Jyotsan Kukate Manasan Dattatreya Gokhale Damayanti Gokhale सेवायज्ञाच्या स्त्रीशक्तीचा सन्मान... Article on Dr. Jyotsna kukade वैद्यकीय आणि सामाजिक कार्याबद्दल एसएनडीटी विद्यापीठ मुंबई येथून डी.लिट पदवी डॉ. ज्योत्स्ना कुकडे (कुकडे काकू) यांना मिळाली. त्या पदवीमागील त्यांची तपश्चर्या आणि केलेला त्याग शब्दातीत आहे. जगणे माझे माणूस व्हावे। शाश्वत मूल्यांची प्रेरणा व्हावे॥ काट्यांनी घेरूनही आनंदाची फुले उमलवणारे जगणे माझे माणूस व्हावे... समाजामध्ये आनंद पेरणारे ‘माणूसपण’ लाभणे हा केवळ दैवीयोगच असतो. हा योग डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांना लाभला. लातूर येथे १९६६ सालापासून समाजासाठी तन-मन-धन अर्पून वैद्यकीय सेवा करणाऱ्या सेवाव्रती म्हणून डॉ. ज्सोत्स्ना कुकडे यांचे सामाजिक योगदान मोठे आहे. माणसाच्या आयुष्यात नेहमीच ‘ऑल इज वेल’ कधीच नसतेच. पण असे ‘ऑल इज वेल’ नसले तरी आपण घेतलेले निर्णय आणि हाती घेतलेले काम यांच्या पूर्तीचा परिणाम हा ‘ऑल इज वेल’ असायलाच हवा आणि याची प्रचिती देणारे डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचे आयुष्य आहे. पुण्याच्या दत्तात्रेय गोखले आणि दमयंती गोखले यांच्या कन्या ज्योत्स्ना. ज्योत्स्ना यांचे माहेर आणि सासर कर्तृत्वान आणि सरस्वतीचे पूजन करणारे. ज्योत्स्नांची आई दमयंती गोखले त्याकाळी द्विपदवीधर होत्या. ज्योत्स्ना यांचे आजोळ पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’ची स्थापना केलेल्या पेंडसे कुटुंबातील. एस. एम. जोशी हे ज्योत्स्ना यांच्या मावशी तारा यांचे यजमान. हे सगळे सांगण्याचे कारण की संस्कार आणि कर्तृत्व यांचे अमूल्य देणे ज्योत्स्ना य