विरारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

    दिनांक  04-Mar-2019
 
 

विरार : विरारमध्ये पोलिसांनी १८३ जिलेटीनच्या कांड्यासह मोठा स्फोटक साठा जप्त केला आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इतका मोठा स्फोटक साठा जिल्ह्यात आलाच कुठून असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

रविवारी मांडवी क्षेत्राच्या हद्दीत विरार पोलिसांनी छापा टाकला असता एकूण २४ इलेक्ट्रोनिक डेटोनेटर जप्त करण्यात आली. दरम्यान सदर स्फोटकाचा कसून तपास केला असता. सोमवारी सायवन येथील एका बंगल्यात स्फोटके असल्याची माहिती मिळाली.

 

दरम्यान, पोलिसांनी या बंगल्यात छापा टाकला असता १८३ जिलेटीनच्या कांड्या आणि १०३ डिटोनेट आणि नॉन इलेक्ट्रोनिक डेटोनेटरच्या ३४५ कांड्या, सेफ्टी फ्युजचे २१ बंडल जप्त करण्यात आले. याबाबत बंगल्याचे मालक तुकाराम हडळ आणि मालकीण बिना हडळ यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे . दरम्यान बंगल्याचे मालक कशासाठी स्फोटके वापरणार होते याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat