मिशन शक्तीचे संबोधन हे आचारसंहितेचे उल्लंघन नव्हे; निवडणूक आयोगाची माहीती

29 Mar 2019 11:11:12

नवी दिल्ली :   अंतराळात हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांना भेदण्याची क्षमता असलेल्या 'ए-सॅटया क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. 'मिशन शक्ती' ही मोहीम डीआरडीओच्या शास्रज्ञानी यशस्वीरीत्या पार पाडून देशाला अंतरिक्ष महासत्ता बनविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याचा निवडणूकीशी संबंध लावत विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला होता.

हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संबोधनामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान, डीआरडीओ प्रमुखांनीही या प्रकरणी मोठा खुलासा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरूनच ही मोहिम पार पडली असल्याची माहिती डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिली.

या मोहिमेसाठी तब्बल १०० शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत होते, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. "राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली ही मोहीम सुरू होती. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आम्ही ही मोहीम फत्ते करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या मोहिमेवर काम सुरु करण्यात आले. मागील सहा महिन्यापासून डीआरडीओ मिशन मोडवर होते." रेड्डी यांच्या या खुलास्याने विरोधक तोंडावर पडले आहेत, अशी टीका भाजपकडून केली जात आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat





Powered By Sangraha 9.0